मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी, 2026

🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...

चालू घडामोडी 26 जानेवारी, 2026

 • अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र

सैन्य दलाच्या 70 अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार

• आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station – ISS) पाऊल ठेवणारे पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी इतिहास घडवला.

• त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अशोक चक्र (Ashok Chakra) जाहीर करण्यात आला आहे.

• प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली.

• एकूण 70 सेनाधिकारी शौर्य पुरस्कारांनी सन्मानित.

• या पुरस्कारांमध्ये –

• अशोक चक्र – 1

• कीर्ती चक्र – 3 (त्यापैकी 1 मरणोत्तर)

• शौर्य चक्र – 13 (त्यापैकी 1 मरणोत्तर)

• सेना पदक (शौर्य) – 44

• नौसेना पदक (शौर्य) – 6

• वायुसैनिक पदक (शौर्य) – 2

• शुभांशु शुक्ला यांचा अनुभव

• 2000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव.

• Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier, AN-32 या विमानांवर सेवा.

• जून 2006 मध्ये भारतीय वायुदलाच्या लढाऊ शाखेत दाखल.

• ISS मोहिमेदरम्यान पृथ्वीभोवती सुमारे 22,600 सागरी मैल (40,000 किमी) प्रवास.


  प्रजासत्ताक दिन : प्रमुख पाहुणे (Last 11 Years)

• 2026 – अँटोनियो कोस्टा (Antonio Costa), अध्यक्ष – युरोपियन कौन्सिल (European Council)

• 2026 – उर्सुला व्हॉन डर लायन (Ursula von der Leyen), अध्यक्ष – युरोपियन आयोग (European Commission)

• 2025 – प्राबोवो सुबियांतो (Prabowo Subianto), राष्ट्राध्यक्ष – इंडोनेशिया

• 2024 – इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron), राष्ट्राध्यक्ष – फ्रान्स

• 2023 – अब्देल फत्ताह एल-सिसी (Abdel Fattah El-Sisi), राष्ट्राध्यक्ष – इजिप्त

• 2020 – जाइर बोल्सोनारो (Jair Bolsonaro), राष्ट्राध्यक्ष – ब्राझील

• 2019 – सिरिल रामाफोसा (Cyril Ramaphosa), राष्ट्राध्यक्ष – दक्षिण आफ्रिका

• 2018 – ASEAN देशांचे प्रमुख (Heads of ASEAN States) – एकूण 10 पाहुणे

• 2017 – मोहम्मद बिन झायेद अल नह्यान (Mohammed bin Zayed Al Nahyan), क्राऊन प्रिन्स – अबूधाबी

• 2016 – फ्राँस्वा ओलांद (Francois Hollande), राष्ट्राध्यक्ष – फ्रान्स


जागतिक बँके (World Bank) चा  ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स (GEP) अहवाल 2026

जागतिक बँकेने (World Bank) जानेवारी २०२६ चा 
ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स (GEP) अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

जागतिक विकास दर: २०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर स्थिर राहण्याचा अंदाज आहे, परंतु विकसित अर्थव्यवस्थांमध्ये वाढीचा वेग मंदावलेला असेल.

भारताची स्थिती: भारताचा विकास दर ७% च्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था कायम राहील.

प्रमुख आव्हाने: उच्च व्याजदर, भू-राजकीय तणाव (Geopolitical tensions) आणि वाढते कर्ज हे जागतिक अर्थव्यवस्थेपुढील प्रमुख धोके असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

गुंतवणूक: उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये खाजगी गुंतवणुकीला चालना देण्याची गरज या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे.

भारत फ्युचर सिटी (BHARAT FUTURE CITY)

तेलंगणा सरकारने संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील कंपन्यांच्या सहकार्याने हैदराबादजवळ 'भारत फ्युचर सिटी' (Bharat Future City) विकसित करण्याची योजना आखली आहे.

या प्रकल्पाची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

नेट-झिरो सिटी: ही भारतातील पहिली पूर्णपणे 'नेट-झिरो' (Net-Zero) कार्बन उत्सर्जन करणारी ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी असेल.

ठिकाण: हे शहर तेलंगणातील मुचर्ला (Mucherla) परिसरात विकसित केले जाणार आहे.

जागतिक दर्जाच्या सोयी: यामध्ये एआय (AI) सिटी, प्रगत आरोग्य सेवा (Health City), आधुनिक क्रीडा संकुले आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश असेल.

गुंतवणूक: दुबईतील 'मासदर' (Masdar) सारख्या मोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने शाश्वत ऊर्जेवर आधारित पायाभूत सुविधा येथे उभारल्या जातील.

तेलंगणा राज्याला जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


'करुणा अभियान' 

हा गुजरात सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो प्रामुख्याने दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात (पतंगोत्सवादरम्यान) राबवला जातो.

या अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

उद्देश: पतंगाच्या धारदार मांज्यामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांना आणि वन्यजीवांना तत्काळ वैद्यकीय उपचार देऊन त्यांचे प्राण वाचवणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

अंमलबजावणी: हे अभियान दरवर्षी साधारणपणे १० ते २० जानेवारी दरम्यान संपूर्ण गुजरात राज्यात राबवले जाते.

सुविधा: यासाठी राज्यभर फिरती पशुवैद्यकीय दवाखाने (Mobile Veterinary Vans), हेल्पलाइन क्रमांक (१९६२) आणि नियंत्रण कक्ष (Control Rooms) कार्यान्वित केले जातात.

लोकसहभाग: यामध्ये वन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि अनेक स्वयंसेवी संस्था (NGOs) एकत्र येऊन काम करतात.पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्यावरील उपचारांसाठी सुरू करण्यात आलेला हा एक स्तुत्य सामाजिक उपक्रम मानला जातो.


पद्म पुरस्कार 2026

पद्म पुरस्कार 2026 – एकूण संख्या

• एकूण पुरस्कार – 131
• पद्म विभूषण – 5
• पद्म भूषण – 13
• पद्मश्री – 113

राज्यानुसार सर्वाधिक पुरस्कारप्राप्त
• महाराष्ट्र – 15
• तमिळनाडू – 13
• उत्तर प्रदेश – 11
• पश्चिम बंगाल – 11
• केरळ – 8

महाराष्ट्रातील 🏅 महाराष्ट्रातील पद्म विभूषण पुरस्कार विजेते

✅ धर्मेंद्र सिंह देओल – कला (मरणोत्तर)


🏅 महाराष्ट्रातील पद्म भूषण पुरस्कार विजेते

✅ पियुष पांडे – कला (मरणोत्तर)

✅ अलका याज्ञिक – कला

✅ उदय कोटक – व्यापार व उद्योग


🏅 महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते

✅ सतीश शाह (मरणोत्तर) – कला

✅ आर्मिडा फर्नांडिस – वैद्यकीय क्षेत्र

✅ अशोक खाडे – व्यापार व उद्योग

✅ भिकल्या लाडक्या धिंडा – कला

✅ जनार्दन बापूराव बोथे – समाजकार्य

✅ जुझेर वासी – विज्ञान व अभियांत्रिकी

✅ माधवन रंगनाथन – कला

✅ रघुवीर तुकाराम खेडकर – कला

✅ रोहित शर्मा – क्रीडा

✅ सत्यनारायण नुवाल – व्यापार व उद्योग

✅ श्रीरंग देवबा लाड – इतर – कृषी क्षेत्र

पद्मश्री विशेष:

-भिकल्या धिंडा हे १० फुटी तारपा वाजवण्यासाठी प्रसिद्ध असून यांना 2026 चा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले 

-तारपा हे गारुड्याच्या पुंगीसारखे असणारे वाद्य वाजविणारा वादक जेव्हा आपली लय बदलतो त्यावेळी या नृत्याची लयही बदलते असे या नृत्याचे स्वरूप आहे.

-वारली चित्रपट्टीतील तारपा नृत्य:

-पालघर, महाराष्ट्रतील काही भाग दादरा आणि नगर हवेली प्रांतातील वारली आदिवासींमध्ये हे नृत्य विशेष प्रचलित आहे.

-तारपा वाद्य:

तारपा हे वाद्य नारनदेव या देवतेने वारली जनजातीला दिले अशी या जनजातीत समजूत प्रचलित आहे.वाळवलेल्या भोपळ्यापासून हे वाद्य तयार करतात.

.......................................................................................................................................................................

दिनविशेष:

-77 वा प्रजासत्ताक दिन.

-सर्वोच्च न्यायालयचे उदघाटन (1950)

-महाराष्ट्र रोजगार हमी योजना कायदा लागू (1979)

-दादरा-नगर-हवेली आणि दमणदिव यांचे एकत्रिकरण(2020)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट