26 जानेवारी 2026 पासून चालू घडामोडी मराठी विश्व हा ब्लॉग सुरु करण्यात आलेला आहे. MPSC|सरळसेवा| पोलीस भरती | तलाठी | व इतर स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त व परीक्षाभिमुख चालू घडामोडी येथे रोज पोस्ट केले जातात 📚📝
🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...
विदर्भ प्रादेशिक ग्रामीण बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँकेत विलीन केली.
-1 मे 2025 पासून हे विलिनीकरण प्रत्यक्षात आले आहे. या एकत्रित बँकेचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगर ला असेल.
-One state One RRB POLICY
टायलर पुरस्कार:
अमेरिकन उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डॉ. टोबी केअर्स यांना 2026 च्या पर्यावरणीय कामगिरीसाठीच्या टायलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
'कलाडी' ला GI टॅग
-'कलाडी' (Kaladi) हे जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्याचे अत्यंत लोकप्रिय पारंपारिक दुग्धजन्य उत्पादन असून त्याला GI टॅग (Geographical Indication) प्राप्त झाला आहे. या मानांकनामुळे या स्थानिक पदार्थाला जागतिक ओळख मिळाली आहे.
-कलाडीबद्दल काही महत्त्वाची माहिती:
स्वरूप: हे कच्च्या दुधापासून बनवलेले एक प्रकारचे 'दाट चीज' (Dense Cheese) आहे.
हे दूध फाडून आणि नंतर उरलेल्या चक्क्याला उन्हात वाळवून तयार केले जाते.याला अनेकदा 'जम्मूचे चीज' (Cheese of Jammu) असेही संबोधले जाते.
सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026
🏆 2026 चे विजेते
1️⃣ वैयक्तिक श्रेणी (Individual Category)
👤 लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके
भारतीय सैन्य अधिकारी वायनाड (केरळ) पूर व भूस्खलन 2024 दरम्यान धाडसी बचावकार्य प्रभावी आपत्ती प्रतिसाद यासाठी पुरस्कार
2️⃣ संस्थात्मक श्रेणी (Institutional Category)
🏢 Sikkim State Disaster Management Authority (SSDMA)
सिक्किम राज्य उत्कृष्ट आपत्ती पूर्वतयारी, प्रतिसाद व व्यवस्थापन प्रणाली साठी निवड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा