26 जानेवारी 2026 पासून चालू घडामोडी मराठी विश्व हा ब्लॉग सुरु करण्यात आलेला आहे. MPSC|सरळसेवा| पोलीस भरती | तलाठी | व इतर स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त व परीक्षाभिमुख चालू घडामोडी येथे रोज पोस्ट केले जातात 📚📝
🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...
नंबेओ (Numbeo) सेफ्टी इंडेक्स २०२६ (Safety Index 2026) -
-नंबेओ (Numbeo) या जागतिक डेटाबेसने जानेवारी २०२६ मध्ये केला जाहीर.
-मंगळुरू हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरले.
-मंगळरूने सलग दुसऱ्या वर्षी भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
-जागतिक रँकिंग: जगातील ३०४ प्रमुख शहरांच्या यादीत मंगळुरू ४६ व्या स्थानावर आहे.
-सेफ्टी स्कोअर: शहराला १०० पैकी ७४.४ असा सुरक्षितता गुण (Safety Score) मिळाला असून, येथील क्राईम इंडेक्स २५.६ (खूप कमी) इतका आहे.
मंगळुरूनंतर
अहमदाबाद (दुसरे),
जयपूर (तिसरे),
कोइम्बतूर (चौथे)
या शहरांचा क्रमांक लागतो.
उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान नवीन नाव जन भवन
उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान, जे आतापर्यंत 'राजभवन' म्हणून ओळखले जात होते, त्याचे नाव बदलून आता 'जनभवन' करण्यात आले आहे.
ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यांमध्ये ४०० विजय मिळवणारा जगातील पहिला खेळाडू - नोव्हाक जोकोविच (देश-सर्बीया)
-ही ऐतिहासिक कामगिरी २०२६ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान केली.
-विक्रमी सामना: जोकोविचने नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डी झांडशल्प (Botic van de Zandschulp) याचा पराभव करून हा ४०० वा विजय नोंदवला.
कारकीर्द: जोकोविचने आतापर्यंत २४ ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहेत.
ग्रँड स्लॅममधील सर्वाधिक विजयांची यादी:
नोव्हाक जोकोविच: ४०० विजय
रॉजर फेडरर: ३६९ विजय
सेरेना विल्यम्स: ३६७ विजय
ऑपरेशन प्रहार-पंजाब राज्य
-संघटित गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी पंजाब राज्यात 'ऑपरेशन प्रहार' सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन-
अजित आशाताई अनंतराव पवार(२२ जुलै १९५९ – २८ जानेवारी २०२६)
-सहकार क्षेत्रापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि सुरुवात
- १९८२ मध्ये एका सहकारी साखर कारखान्याच्या बोर्डावर निवडून येऊन त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
-१९९१ मध्ये त्यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDC) अध्यक्षपदी निवड झाली.
संसदीय कारकीर्द:
-१९९१ मध्ये ते प्रथमच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मात्र अवघ्या काही महिन्यांतच या पदाचा राजीनामा दिला.
विधानसभा आणि मंत्रिपदे:
-१९९१ पासून त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे सलग नऊ वेळा प्रतिनिधित्व केले.
-कृषी, जलसंपदा, ऊर्जा, नियोजन आणि वित्त यांसारखी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली.
उपमुख्यमंत्रिपदाचा विक्रम:
अजित पवार यांनी विक्रमी ६ वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुती अशा वेगवेगळ्या युती सरकारांमध्ये हे पद सांभाळले.
दुर्दैवी अंत:
२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ गोजुबावी या गावात एका विमान अपघातात त्यांचे निधन झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा