मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी, 2026

🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...

चालू घडामोडी 30 जानेवारी, 2026

भारत ऊर्जा सप्ताह 2026 (India Energy Week 2026)-गोवा

-भारत ऊर्जा सप्ताह 2026 (India Energy Week 2026) चे आयोजन 27 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान गोव्यातील ओएनजीसी एटीआय (ONGC ATI), बेटुल येथे.
-पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत होणाऱ्या या चौथ्या आवृत्तीत जागतिक ऊर्जा नेते, सीईओ आणि धोरणकर्ते, शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी एकत्र येत आहेत. 


2025 पर्यंत भारतात इंटरनेट वापरकर्ते : 95 कोटी
माहितीचा स्रोत : Internet and Mobile Association of India (IAMAI)

वाढीची कारणे :

1.ग्रामीण भागातील वाढती कनेक्टिव्हिटी
2.लघु चित्रफितांची लोकप्रियता
3.कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर


देशात राहणीमानाच्या दर्जाबाबत सर्वात उत्तम शहरे
(Ease of Living Index 2025)
क्रमांकनुसार शहरे :
1)पुणे
2)नवी मुंबई
3)मुंबई
4)तिरुपती
5)चंदीगड
6)ठाणे
7)रायपूर
8)इंदोर
9)विजयवाडा
10)भोपाळ
परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोंदी (Notes):
हा निर्देशांक राहणीमानाचा दर्जा (Quality of Life) दर्शवतो.
यात खालील बाबी विचारात घेतल्या जातात:
-पायाभूत सुविधा
-आरोग्य व शिक्षण
-रोजगार संधी
-पर्यावरण
-सार्वजनिक सेवा
स्रोत : Ease of Living Index 2025
पुणे देशात प्रथम क्रमांकावर 

परीक्षेच्या दृष्टीने One liner-

प्र.1) अलिकडेच आकांक्षी जिल्ह्यांसाठी संपूर्ण अभियान 2.0 कोणी सुरू केले?
👉 उत्तर: नीती आयोग

प्र.2) कोणत्या राज्यात होया नागेन्सिस नावाची नवीन वनस्पती प्रजाती सापडली आहे?
👉 उत्तर: नागालँड

प्र.3) केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानांतर्गत निधी मिळालेल्या प्रकल्पांच्या रिअल-टाइम देखरेखीसाठी पुनरावलोकन पोर्टल कोणी सुरू केले?
👉 उत्तर: ओडिशा

प्र.4) रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडविण्यासाठी पात्र ठरणारी भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे?
👉 उत्तर: हंजा शर्मा

प्र.5) पुरुष हॉकी इंडिया लीग 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले?
👉 उत्तर: कलिंगा लान्सर्स

प्र.6) अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदेची तिसरी बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती?
👉 उत्तर: कोची

प्र.7) नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत कोणत्या राज्य सरकारने मुलींसाठी 1250 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे?
👉 उत्तर: गुजरात 

प्र.8) भारतीय सैन्याचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल कोडंडेरा एम. करिअप्पा यांची जयंती 28 जानेवारी 2026 रोजी कितवी साजरी करण्यात आली?
👉 उत्तर: 127 वी

प्र.9) इंडिया एनर्जी वीक (IEW) चा चौथा संस्करण कधी आयोजित करण्यात आला होता?
👉 उत्तर: 27 ते 30 जानेवारी

प्र.10) 7 वा इंडिया इंटरनॅशनल सीवीड एक्स्पो आणि समिट कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता?
👉 उत्तर: कोची


दिनविशेष 
-वि दा सावरकर यांना जन्मठेप शिक्षा -1911
(जॅक्सन खून प्रकरणी)
-नथुराम गोडसे कडून महात्मा गांधी यांची हत्या (1948)
-हुतात्मा दिन 
-राष्ट्रीय कुष्ठारोग निवारण दिन.

📲 चालू घडामोडी Telegram Channel Join करा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट