मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी, 2026

🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...

चालू घडामोडी 31 जानेवारी, 2026

विली रिसर्च हिरोज पुरस्कार २०२५' (Wiley Research Heroes 2025) -डॉ. चंद्रकांत लहरिया यांना 
-सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांना त्यांच्या उत्कृष्ट संशोधनासाठी आणि योगदानासाठी.

या पुरस्काराविषयीच्या काही महत्त्वाच्या बाबी:
-संशोधनातील योगदान: हा पुरस्कार अशा संशोधकांना दिला जातो ज्यांच्या कार्याचा समाजावर आणि विशेषतः सार्वजनिक धोरणांवर सकारात्मक परिणाम झाला आहे.
-आरोग्य क्षेत्रातील कार्य: डॉ. लहरिया यांनी भारतातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आणि लसीकरण मोहिमेत मोलाची भूमिका बजावली आहे.
-जागतिक ओळख: विली (Wiley) ही जगातील एक मोठी शैक्षणिक आणि संशोधन संस्था असून, त्यांच्याकडून मिळणारा हा सन्मान जागतिक स्तरावर महत्त्वाचा मानला जातो.

पी व्ही सिंधू महिला एकेरी बॅडमिंटन मध्ये 500 विजय मिळवणारी पहिली भारतीय, जगात 6वी

-ऐतिहासिक विजय: सिंधूने २२ जानेवारी २०२६ रोजी जकार्ता येथे झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर ५०० स्पर्धेत हा पराक्रम केला.
-या खास यादीत सिंधूसोबत
 रत्चानोक इंतानोन,
 ताई झु यिंग,
 अकाने यामागुची,
 कॅरोलिना मारिन 
आणि पेट्या नेदेलचेवा 
यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. 

महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली
सुनेत्रा पवार – राजकीय प्रवास
नाव: सुनेत्रा अजित पवार
🟢 जन्मतारीख : 18 ऑक्टोबर 1963
🟢 कुटुंब -वडील: बाजीराव पाटील
               भाऊ: पद्मसिंह पाटील
               वडील व भाऊ दोघेही राजकारणात सक्रिय होते.
🟢 शिक्षण -1983: वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त.
🟢 वैवाहिक जीवन-1985: अजित पवार यांच्याशी विवाह
अपत्ये: 2 मुले –पार्थ पवार,जय पवार
🟢 सामाजिक कार्य -
NGO: एन्व्हायर्नमेंटल फोरम इंडिया ची स्थापना
बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क: अध्यक्षा म्हणून कार्य
हजारो महिलांना रोजगार
विद्या प्रतिष्ठान: विश्वस्त
पुणे विद्यापीठ: सिनेट सदस्य म्हणून कार्य
🟢 राजकारणात प्रवेश
          2024 लोकसभा निवडणूक: बारामती मतदारसंघातून लढवली
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा पराभव
18 जून 2024:
राज्यसभेवर बिनविरोध निवड
सध्या उपमुख्यमंत्री (Deputy CM) म्हणून कार्यरत.

🟥उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मिळालेली खाती: 

1. उत्पादन शुल्क
2. क्रीडा व युवक सेवा
3. अल्पसंख्यांक विभाग आणि वक्फ

🔴भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे🔴

🔶छारी धांड - गुजरात 
● ही बन्नीच्या शुष्क गवताळ प्रदेश आणि कच्छच्या खाऱ्या जमिनीच्या दरम्यान स्थित एक हंगामी खारट पाणथळ जागा आहे
.
🔶पाटणा पक्षी अभयारण्य - उत्तरप्रदेश
● या गोड्या पाण्यातील दलदली, जंगले आणि गवताळ प्रदेश आहेत आणि ते कृषी भूदृश्यांनी वेढलेले आहे. एकत्रितपणे, हे वेगवेगळे भूदृश्य विविध प्रकारचे अधिवास निर्माण करतात आणि उच्च पातळीच्या जैवविविधतेला आधार देतात.

● 2014 मध्ये भारताकडे फक्त 26 Ramsar Sites होती
● आज ती संख्या 98 पर्यंत वाढली आहे—● म्हणजे 276% पेक्षा जास्त वाढ!

 रामसर स्थळांच्या बद्दल माहिती
भारतात एकूण 98 रामसर स्थळे झाली 
भारतात एकूण 13,84,140  हेक्टर क्षेत्र व्यापतात
तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसार
जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी
रामसर कराराची तारीख - 2 फेब्रुवारी 1971
रामसर मुख्यालय - ग्लैंड, स्वित्झर्लंड
भारतातील पहिले रामसर स्थळ - चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राज्यस्थान)



दिनविशेष
-मुकनायक पाक्षिक सुरवात -1920
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर)



📲 चालू घडामोडी Telegram Channel Join करा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट