मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी, 2026

🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...

चालू घडामोडी 1 फेब्रुवारी, 2026

एलेना रयबाकिना ऑस्ट्रेलियन ओपन विजेती(महिला एकेरी)

कझाकस्थानची टेनिसपटू एलेना रयबाकिना हिने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडू आर्यना सबालेंका(बेलारुस) हिचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. हा सामना अत्यंत चुरशीचा व रोमांचक ठरला.
स्पर्धेची माहिती
स्पर्धेचे नाव: ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा
स्पर्धेचा प्रकार: ग्रँडस्लॅम
स्पर्धेचे ठिकाण: मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
प्रकार: महिला एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन 2026

कार्लोस अल्काराझ ऑस्ट्रेलियन ओपन विजेता (पुरुष एकेरी)

अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझने सर्बियन दिग्गज नोवाक जोकोविचला हरवून ग्रँड स्लॅम मालिका जिंकली.

▪️वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी, अल्काराझने त्याच्या कारकिर्दीचा ग्रँड स्लॅम पूर्ण केला आणि टेनिस इतिहासातील असा पराक्रम करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला.


निर्मला सीतारामन मॅडम 9व्यंदा सादर केला अर्थसंकल्प.
पी चिदंबरम याच्याशी बरोबरी

◾️सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प : मोरारजी देसाई यांनी 10 वेळा मांडला
◾️"भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 7 एप्रिल 1860  जेम्स विल्सन
◾️"स्वतंत्र भारताचा" पहिला अर्थसंकल्प :  26 नोव्हेंबर 1947 : पहिले अर्थमंत्री आर के षणमुखम् शेट्टी यांनी मांडला
◾️"प्रजासत्ताक भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन माथाई यांनी मांडला


बजेटमधील मोठ्या घोषणा
• केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये दुर्मिळ खनिज उत्खनन सुरू करणार.
• भारताला औषध निर्मितीचे हब बनवून, बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद.
• पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि उद्योगांना चालना देणार.
• इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स – सेमी कंडक्टरसाठी 40,000 कोटींची तरतूद.
• सरकार दुर्मिळ रेअर अर्थ मॅनेट कॉरिडॉर तयार करणार.
• जागतिक-मानक औषध नियामक स्थापन करेल.
• सरकार तीन केमिकल पार्क उभे करणार.
• आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी केमिकल पार्क बांधले जातील.
• भारताचे सेमीकंडक्टर मिशन, आम्ही ISM 2.0 राबवणार आहोत. त्यामुळे सप्लाय चेनला मदत होईल.
• महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना राबवतोय.
ज्या अंतर्गत एक जिल्हा – एक उत्पादन आणि ग्रामीण भागातील तरुणांना ट्रेनिंग व उद्योग देणार आहेत.
• खेळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनावर भर देणार आहेत.
• बायो फार्मातील संशोधन वाढवण्यासाठी 3 नवीन शैक्षणिक संस्था उभ्या करणार.
• हायटेक टूल रूम्स उभारणार, ज्यामुळे कमी दरात वाहनांचे डिझाईन्स साकारता येणार.
• कंटेनर उत्पादनासाठी आम्ही योजना राबवणार आहोत.
• टेक्सटाईल सेक्टरसाठी – टेक्सटाईल्स एक्सपान्शन योजना राबवणार आहेत.
• नॅशनल हँडलूम प्रोग्रामद्वारे हातमागाला प्राधान्य देणार आहेत.


आयकर कायद्यात काय?
• नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार.
• आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत –
आयटीआर-1 आणि आयटीआर-2 दाखल करणारे 31 जुलैपर्यंत दाखल करू शकतील.
• ऑडिट नसलेल्या व्यवसाय प्रकरणे आणि ट्रस्टसाठी
रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असेल.
• शिक्षण आणि आरोग्यासाठीचा टीसीएस दर कमी करण्यात आला आहे.
तो 5% वरून 2% पर्यंत कमी करण्यात येईल.
• अपघाती विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही.

Union Budget 2026 :
 वित्तीय तूट जीडीपीच्या ४.४% टक्के - सीतारामण
Union Budget 2026-27 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, "आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये, वित्तीय तूट जीडीपीच्या ४.४% असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक वर्ष २०२७ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ४.३% राहील."

दिनविशेष 
-अंतराळयान “कोलंबिया” अंतराळातून परतताना स्फोट (2003)
(कल्पना चावलासहित 7 अंतराळवीर मृत्युमुखी)
-स्वा. सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करून प्रायोपवेशनास प्रारंभ केला (1966)
-निर्यात ऋण विकास योजना (NIRVIK) (2020)
-राष्ट्रीय अन्नसुरक्षा 2013 महाराष्ट्रात लागू.

📲 चालू घडामोडी Telegram Channel Join करा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट