मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी, 2026

🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...

चालू घडामोडी 4 फेब्रुवारी, 2026

 🔴कॅप्टन हंसजा शर्मा ठरल्या  एएलएच (ALH) रुद्र हे सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला लष्करी पायलट 

- नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत समारंभात त्यांना 'कॉम्बॅट एव्हिएटर' म्हणून गौरवण्यात आले. 
-कॅप्टन हंसजा या मूळच्या हिमाचल प्रदेशातील असून त्यांनी या यशाने संरक्षण दलात महिलांचे स्थान अधिक बळकट केले आहे.
 
🔴मणिपूर चे नवीन मुख्यमंत्री- युमनाम खेमचंद सिंह 

🔴दक्षिण कोरिया ने जगातील पहिला व्यापक आणि पूर्णपणे कार्यान्वित एआय कायदा (एआय बेसिक ॲक्ट) लागू केला 

- युरोपियन युनियनचा एआय कायदा आधी मंजूर झाला असला तरी, तो टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे; 
- दक्षिण कोरियाने हा कायदा थेट अंमलात आणून जागतिक स्तरावर आघाडी घेतली आहे.

🔴16 वा वित्त आयोग (16th Finance Commission)

-वित्त आयोग ही एक संविधानिक संस्था आहे.
-दर 5 वर्षांनी राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करतात.
-केंद्र-राज्य वित्तीय संबंधांवर शिफारशी करणे हे मुख्य कार्य आहे.
-16 वा वित्त आयोगाचे अध्यक्ष : डॉ. अरविंद पनगढिया
-अहवाल संसदेत सादर : 1 फेब्रुवारी 2026
-कालावधी : 2026-27 ते 2030-31

🔴13 वा संयुक्त लष्करी सराव खंजर 

▪️खंजर सराव हा भारत आणि किर्गिस्तान यांच्यातील वार्षिक संयुक्त विशेष दलांचा लष्करी सराव आहे , जो 2011 मध्ये सुरू झाला.

▪️13 वी आवृत्ती  खंजर-XIII, 4 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2026 दरम्यान मिसमरी आसाम येथे होईल .


🔴World Cancer Day 2026

▪️दरवर्षी 4 फेब्रुवारी

▪️2025-2027 थीम -United by Unique.

▪️अधिकृतपणे स्थापना 4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिसमध्ये.

▪️2022-2024 थीम : काळजीची तफावत कमी करा.

▪️SDG 3.4 मध्ये 2030 पर्यंत प्रतिबंध आणि उपचारांद्वारे कर्करोगासह असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे अकाली मृत्युदर एक तृतीयांश कमी करण्याचे जागतिक लक्ष्य.

🔴हिवाळी ऑलिंपिक 2026

▪️2026 चे हिवाळी ऑलिंपिक इटलीमध्ये होणार आहे .

▪️2026 चे अधिकृत शुभंकर टीना आणि मिलो आहेत.

▪️इटली तिसऱ्यांदा हिवाळी ऑलिंपिकचे आयोजन करत आहे .

1.कॉर्टिना डी'अँपेझो (1956)
2.ट्यूरिन (2006)

▪️दर 4 वर्षांनी एकदा आयोजित केली जाणारी एक आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा आहे.

▪️16 हिवाळी खेळांचा समावेश असेल.


🔴भारतातील पहिले आरआरबी को-ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड.

▪️त्रिपुरा ग्रामीण बँकेने (टीजीबी) त्यांच्या प्रायोजक बँक, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) च्या सहकार्याने भारतातील पहिले प्रादेशिक ग्रामीण बँक (आरआरबी) सह-ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लाँच केले आहे.

🔴पहिली एलएनजी-डिझेल ड्युअल-फ्युएल डेमू ट्रेन

▪️भारतीय रेल्वेने अहमदाबादमध्ये पहिली एलएनजी-डिझेल ड्युअल-फ्युएल डेमू ट्रेन सुरू केली.

▪️एलएनजी-डिझेल ड्युअल-फ्युएल डेमू ट्रेन म्हणजे काय?

कमी अंतराच्या प्रवासी सेवांसाठी सामान्यतः DEMU (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) ट्रेन वापरली जाते. या नवीन मॉडेलमध्ये, DEMU ट्रेनला दुहेरी-इंधन प्रणालीवर चालविण्यासाठी अपग्रेड केले गेले आहे , ज्यामध्ये द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) आणि डिझेल दोन्ही वापरण्यात आले आहेत.

🔴Today's One Liner

1) बीड जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री कोण बनल्या आहेत ?
👉 उत्तर – सुनेत्रा पवार

2) मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
👉 उत्तर – युमनाम खेमचंद सिंह

3) स्क्वॅश ऑन फायर ओपन (PSA कांस्य) स्पर्धा कोणी जिंकली ?
👉 उत्तर – अनाहत सिंग

4) प्रो रेसलिंग लीग २०२६ चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले ?
👉 उत्तर – हरियाणा थंडर्स

5) हरित महाराष्ट्र मोहिमेत २०२६–२०३१ या काळात किती कोटी वृक्ष लागवड ?
👉 उत्तर – ३०० कोटी

6) दलाई लामा यांना ग्रॅमी २०२६ कोणत्या अल्बमसाठी मिळाला ?
👉 उत्तर – “Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama”

7) भारतीय रेल्वेने किती नवीन HSR (हाय-स्पीड) कॉरिडॉर निश्चित केले ?
👉 उत्तर – सात

8) अमेरिकेने भारतावरील आयात टॅरिफ ५०% वरून किती केला ?
👉 उत्तर – १८%

9) भारताची ‘कोळंबी राजधानी’ कोणता जिल्हा ?
👉 उत्तर – नेल्लोर (आंध्र प्रदेश)

10) जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो ?
👉 उत्तर –4 फेब्रुवारी

🔴दिनविशेष

-"चलो दिल्ली" चा नारा देत आझाद हिंद सेनेची दिल्लीकडे कूच (1944)

-तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू (1670)
(मालुसरे यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार "गड आला पण सिंह गेला")

-जागतिक कर्करोग दिवस


📲 चालू घडामोडी Telegram Channel Join करा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट