मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी, 2026

🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...

चालू घडामोडी 6 फेब्रुवारी, 2026

🔴भारताने सहाव्यांदा Under-19 विश्वचषकावर आपले नाव कोरले 

6 फेब्रुवारी 2026 रोजी झिम्बाब्वेमधील हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून सहाव्यांदा 19 वर्षांखालील (Under-19) विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.

विजेता : भारत (आयुष म्हात्रे : कर्णधार)
उपविजेता : इंग्लंड (लुक बेनकेनस्टाईन : कर्णधार)

परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : 
1] वैभव सूर्यवंशी या खेळाडूने अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली. [हा अंडर-19 विश्वचषक फायनलमधील आतापर्यंतचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे.]
2] भारत या स्पर्धेच्या इतिहासात 6 वेळा जेतेपद मिळवणारा एकमेव संघ ठरला आहे (2000, 2008, 2012, 2018, 2022, 2026)
3] भारतीय संघाने 2016 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला आहे.
4] वैभव सूर्यवंशी ला अंतिम सामन्यात केवळ 80 चेंडूंत 175 धावांची खेळी केल्यामुळे Man of the Match हा पुरस्कार देण्यात आला. 
5] मॅन ऑफ द सीरिज (Player of the Tournament) हा पुरस्कार सुद्धा वैभव सूर्यवंशी लाच मिळाला आहे.

🔴🏆 WPL 2026 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विजेते
🔸 स्पर्धा नाव :   विमेन प्रीमियर लीग (WPL) 2026
🔸 विजेता संघ : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
🔸 उपविजेता संघ : दिल्ली कॅपिटल्स (DC)

📊 रेकॉर्ड्स आणि खास गोष्टी
⭐ उच्च चेज़:
RCB ने हा सर्वात जास्त यशस्वी चेज़ WPL Final मध्ये पूर्ण केला! (204 धावा)
⭐ RCB इतिहास:
ही RCB ची दुसरी WPL विजेतेपद ठरली. 
⭐ DC ची दुर्दैवी फाइनल:
Delhi Capitals WPL Final मध्ये सलग चौथ्यांदा उपविजेत्या ठरले..

🔴IOC मध्ये इराणची पहिली महिला सदस्य –सोराया आघाई 

-आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) इराणमधून पहिल्यांदाच एका महिलेला सदस्य म्हणून निवडून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. 
-सोऱाया आघाई (Soraya Aghaei) यांची 4 फेब्रुवारी 2026 रोजी IOC सदस्य म्हणून निवड झाली.
ही निवड इराणसाठी तसेच जागतिक ऑलिम्पिक चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण त्या IOC मध्ये निवड झालेल्या पहिल्या इराणी महिला सदस्य ठरल्या आहेत.
याशिवाय, सोऱाया आघाई या सध्या IOC मधील सर्वात तरुण (youngest) सदस्य म्हणूनही ओळखल्या जात आहेत.
ही घटना महिला प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने आणि ऑलिम्पिक संस्थेमध्ये विविध देशांतील सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने एक मोठा टप्पा मानली जात आहे.


🔴कर्नाटक मध्ये पंचायत निवडणुकीत EVM ऐवजी मतपत्रिका(Ballot Paper) वापर होणार 

कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाने आगामी पंचायत निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) ऐवजी मतपत्रिका (Ballot Paper) आणि मतपेटी (Ballot Box) वापरण्यास मंजुरी दिली आहे. हा निर्णय राज्यातील निवडणूक प्रक्रियेत एक मोठा बदल मानला जात आहे.
या निर्णयामुळे कर्नाटक राज्याने पंचायत स्तरावर पुन्हा एकदा पारंपरिक मतदान पद्धतीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या मते, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये EVM च्या विश्वासार्हतेबाबत आणि पारदर्शकतेबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण होत आहेत.
सरकारला असे वाटते की मतपत्रिकेद्वारे मतदान केल्यास लोकांचा विश्वास अधिक वाढेल आणि निवडणूक प्रक्रियेबद्दलची विश्वसनीयता टिकून राहील. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये पारंपरिक पद्धत वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही घटना भारतातील निवडणूक व्यवस्थेमध्ये EVM विरुद्ध मतपत्रिका या चर्चेला पुन्हा एकदा चालना देणारी ठरली आहे.


🔴अग्नी 3🔥 क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी 

-भारताने आपल्या संरक्षण सज्जतेचे दर्शन घडवत 'अग्नी-३' या इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइलची (IRBM) यशस्वी चाचणी केली आहे. 
-ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून (ITR) ६ फेब्रुवारी रोजी हे प्रक्षेपण करण्यात आले.

-अग्नी-३’ची विद्ध्वंसक वैशिष्ट्ये –
हे क्षेपणास्त्र केवळ वेगवानच नाही, तर अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

वेग: मॅक १५ (ताशी सुमारे १८,५०० किमी), म्हणजेच एका सेकंदात ५ ते ६ किमी अंतर कापण्याची अफाट शक्ती.

पल्ला: ३००० ते ३५०० किलोमीटरपर्यंत अचूक मारा (गरज पडल्यास पल्ला वाढवण्याची क्षमता).

वजन आणि आकार: सुमारे ४८-५० टन वजन आणि १७ मीटर लांबी.

पेलोड: १.५ टनांपर्यंत अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम.

अचूकता: ‘रिंग लेझर जायरोस्कोप’ नेव्हिगेशन प्रणालीमुळे लक्ष्याचा अचूक वेध.

विशेष तंत्रज्ञान: उड्डाणादरम्यान दिशा बदलण्याची क्षमता आणि एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याची MIRV तंत्रज्ञानाची जोड.

अग्नी मालिका: भारताचे ‘ब्रह्मास्त्र’

अग्नी चा इतिहास 

अग्नी-१: ७०० किमी पल्ला
अग्नी-२: २००० किमी पल्ला
अग्नी-३: ३०००-३५०० किमी पल्ला
अग्नी-४: ४००० किमी पल्ला
अग्नी-५: ५०००+ किमी

🔴चीनने इलेक्ट्रिक वाहनांमधील दरवाजांच्या लपवलेल्या हँडलवर(Hidden Handles,) बंदी घातली आहे.

-सुरक्षेच्या कारणास्तव चीनने अशा हँडल्सवर थेट बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 
-हा निर्णय केवळ चीनपुरता मर्यादित नसून, याचे पडसाद आता भारतासारख्या मोठ्या कार बाजारपेठेतही उमटू लागले आहेत.

-अशा प्रकारच्या डिझाईनवर बंदी घालणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे. इलॉन मस्क यांच्या 'टेस्ला' कारमुळे अशी हँडल्स जगभरात प्रसिद्ध झालेले.

दिनविशेष 
-कोल्हापूर प्रजा परिषद स्थापना (1938)
(नेते : माधवराव बागल, सल्लाप्पा कुमार)

-स्टॅन्ले जॅक्सनवर गोळ्या झाडल्या (1932)
(कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थीनीने)

📲 चालू घडामोडी Telegram Channel Join करा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट