मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी, 2026

🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...

चालू घडामोडी 8 फेब्रुवारी, 2026

🔴मेघना सज्जणर ला 10 मी. एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक🥉

-भारतातील शूटींग संघासाठी आशियाई शूटींग चषकात एक अत्यंत उल्लेखनीय क्षण घडला.

 -मेघना सज्जणर यांनी महिलांच्या 10 मी. एअर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, तेही आठ महिन्यांचे गर्भवती असताना.

-त्यांनी या स्पर्धेत भारी शारीरिक आणि मानसिक दबावातही उत्कृष्ट शिस्त, संयम आणि तंत्र दाखवले, व अंतिम फेरीत पोडियमवर स्थान मिळवले. 
हे त्यांच्या कौशल्याचे आणि भारतीय शूटींगच्या खोल ताकदीचे व स्थैर्याचे स्पष्ट उदाहरण आहे.

🔴'ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सव' अंतर्गत आयोजित 'इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह'चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी, असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह तब्बल २२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त व बिझनेस प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे याच परिषदेत गुंतवणुकीचे तीन सामंजस्य करारही पार पाडण्यात आले.

येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन येत्या दोन-तीन महिन्यात विविध क्षेत्रांतील भविष्योन्मुख (फ्युचर रेडी पॉलिसी) धोरणे आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्य शासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये जीसीसी पॉलिसी, जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी, बांबू पॉलिसी जाहीर केली आहे. नवे औद्योगिक धोरण आले आहे. त्यानंतर आता सात नवीन धोरणांची घोषणा येत्या दोन-तीन महिन्यांत होणार आहे. यामध्ये टेक्सटाइल्स अँड ॲपरल, लेदर अँड फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स अँड फॅब, एरोस्पेस अँड डीफेन्स, एमएसएमई, फार्मास्युटिकल बायोटेक अँड मेडिकल डीव्हायसेस, सर्क्युलर इकॉनॉमी, बायो प्लास्टिक या क्षेत्रांतील धोरणांचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ॲडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तीन महत्त्वाचे सामंजस्य करार झालेत. यामध्ये पहिला करार महामेट्रो आणि केअर हॉस्पिटलमध्ये झाला. या प्रकल्पातून सुमारे पंधराशे ते अठराशे रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.

दुसरा करार गॅलक्सी सोलर कंपनीसोबत झाला. कंपनीद्वारे १० हजार कोटींची गुंतवणूक करत सोलर सेल, बॅटरी स्टोअरेज सिस्टीमची निर्मिती होईल. या प्रकल्पाद्वारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा सुमारे चार हजार रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.

तिसरा करार टेलिकॉम टॉवरची निर्मिती करणाऱ्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरसोबत झाला आहे. कंपनीने २०० कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून याद्वारे सुमारे पाचशे रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.

🔴✈️ AAI ला पहिली महिला पूर्णवेळ सदस्य – निवेदिता दुबे 

निवेदिता दुबे या AAI (Airports Authority of India) च्या इतिहासातील पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य ठरल्या आहेत.

वित्त क्षेत्रातील ३२+ वर्षांचा अनुभव, व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून त्यांची ओळख आहे.
AAI ची आर्थिक धोरणे, बजेट नियोजन आणि विमानतळ विकास प्रकल्पांचे आर्थिक व्यवस्थापन आता त्यांच्या जबाबदारीत आहे.
ही नियुक्ती महिला सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरते. ✨✈️

🔴जपानमधील सागा प्रांताचे गव्हर्नर यामागुची योशिनोरी व त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज रामटेक निवासस्थानी भेट घेतली. 

या भेटीत पर्यावरण, प्लास्टिक मुक्ती, शिक्षण आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. नदी पुनरुज्जीवन आणि प्लास्टिकमुक्त जलस्रोत हा राज्याचा प्राधान्यक्रम असून यासाठी जपानचे सहकार्य मोलाचे ठरेल असा विश्वास त्यांच्याशी बोलताना व्यक्त केला.

समुद्रातील व नदीतील प्रदूषण रोखणे, प्लास्टिक कचऱ्याविरुद्ध संयुक्त प्रयत्न करणे तसेच शिक्षण, पशुसंवर्धन आणि सौंदर्यप्रसाधन उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र व जपानचे परस्पर सहकार्य वाढविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. 

  महाराष्ट्राला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, समुद्रातून वाहून येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याचबरोबर नद्यांमधील प्रदूषण हीदेखील चिंतेची बाब असून, भारतीय संस्कृतीत नद्यांचे पवित्र स्थान लक्षात घेता त्यांच्या स्वच्छतेसाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम हाती घेणार आहे, असे त्यांना सांगितले. गव्हर्नर यामागुची यांनी जपानकडील तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापन अनुभव आणि संशोधन क्षमता महाराष्ट्रासोबत सामायिक करण्याची तयारी यावेळी दर्शवली. 

 जपानच्या शिष्टमंडळात प्रादेशिक देवाणघेवाण विभागाचे उपमहासंचालक मसाहिरो ओनो, आंतरराष्ट्रीय धोरण गटाचे उपसंचालक कोजी योशिताके, प्रकल्प प्रमुख कोकी कनामारू आणि जेट्रो सागाचे मुख्य संचालक हिरोशी योनेयामा तसेच पर्यावरण सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन सचिव रामास्वामी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव देवेंद्र सिंह आदी उपस्थित होते.

 पर्यावरण संरक्षण, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात भारत-जपान सहकार्याला ही बैठक नवे परिमाण देणारी ठरेल.

दिनविशेष

-रशिया व जपान यांच्यात युद्ध सुरु (1904)
(या युद्धात जपानने बलाढ्य रशियाचा पराभव केला)
-रँडचा खून करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे
इंग्रजांना सांगणाऱ्या द्रविड बंधूचा (फितूर),
वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी खून केला.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट