मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी, 2026

🔴 वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण “संत सेवालाल महाराज” यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण आता “संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम” असे करण्यात आले आहे 🔴🇮🇳 त्रिपुराची पंचायत देशातील सर्वोत्तम! 🏆 फेब्रुवारी २०२६ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार (DDUPSVP) अंतर्गत जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी, त्रिपुरा ने ८८.४४ गुणांसह देशातील सर्वोत्तम पंचायत म्हणून बहुमान मिळवला आहे. ✨ ठळक वैशिष्ट्ये: सर्वसमावेशक विकास: आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी डिजिटलायझेशन: पारदर्शक कारभारासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शाश्वत ध्येय (SDGs): स्थानिक पातळीवर आदर्श शाश्वत विकास या यशामुळे त्रिपुर राज्याच्या ग्रामीण विकास मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. 🔴🚄🌉 भारतातील पहिला भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्रा नदीला 🏛️ युनियन कॅबिनेट मंजुरी: भारतातील पहिले भूपृष्ठाखालील रेल-कम-रोड टनेल ब्रह्मपुत्र नदीखाल...

चालू घडामोडी 9 फेब्रुवारी, 2026


🔴 एसटीच्या नव्या ५५ आसनी अत्याधुनिक बसेसना हिंदवी स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला ज्या संस्कारांनी आकार दिला, त्या राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याच्या विचारांना दिशा दिली. त्यांच्या नावाने सुरू होणारी ही सेवा इतिहासाचा सन्मान आहे.
या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर सेवेत दाखल होणार असून भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरा आणि अभिमानाचे प्रतीक ठरणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेमागील प्रेरणाशक्ती म्हणून राजमाता जिजाऊ यांचे स्मरण ठेवत हे नामकरण करण्यात आले आहे. यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी एसटी बसेस ओळखल्या जातात. त्याच गौरवशाली परंपरेत राजमाता जिजाऊ या नावाची भर पडली आहे.
सध्याच्या साधारण ४० आसनी बसेसच्या तुलनेत नव्या बसेसमध्ये ५५ प्रवाशांसाठी आसन व्यवस्था असेल. त्यामुळे गर्दीच्या मार्गांवर उभ्या प्रवाशांची संख्या कमी होऊन प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर या बसेस धावणार आहेत.
“राजमाता जिजाऊ” हे नाव स्वराज्याचे संस्कार, मातृशक्तीची प्रेरणा आणि प्रवाशांच्या सोयीसाठीची बांधिलकी दर्शवणारे आहे. इतिहासाच्या साक्षीने सजलेल्या या आधुनिक बसेस लवकरच महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावतील.

🔴स्पेन देशाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी जाहीर केली 
◾️युरोपमध्ये स्पेन हा पहिला देश आहे
◾️नाव-  Social Media Ban for Minors Under 16 (Spain).
◾️घोषणा - 3 फेब्रुवारी 2026, 
◾️पंतप्रधान पेड्रो सांचेझ
◾️घोषणा - दुबई येथील World Governments Summit 2026
ऑस्ट्रेलिया: 16 वर्षांखालील बंदी (डिसेंबर 2025).
◾️फ्रान्स 15 वर्षांखालील बंदी (विधेयक प्रक्रियेत).
.
🔴 भारतातील प्रधानमंत्री सेतू योजना (PM-SETU) साठी वर्ल्ड बँक च कर्ज 
$830 मिलियन (सुमारे ₹6800 कोटी) कर्ज मंजूर करणारी संस्था वर्ल्ड बँक आहे
◾️दिनांक - 2 फेब्रुवारी 2026
◾️परतफेड: 11.5 वर्षे maturity, यात 4 वर्षे grace period.
लक्ष्य:
◾️5 वर्षांत 1000 ITIs अपग्रेड.
2p लाख+ युवक प्रशिक्षण (दरवर्षी 10 लाख+).
◾️NSTIs ला सेंटर्स ऑफ एक्सीलेंस बनवणे (ट्रेनर्ससाठी).
◾️PM-SETU - Pradhan Mantri Skilling and Employability Transformation through Upgraded ITIs.

🔴विटानीन बी 12 बाबत PRIYA चाचणी -

पुणे ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींवर करण्यात आलेल्या Pune Rural Intervention in Young Adolescents (PRIYA) या चाचणीच्या पुढील निष्कर्षांनुसार, किशोरावस्थेत दिलेले व्हिटॅमिन B12 पूरक आहार पुढे होणाऱ्या बाळाच्या (नवजात) आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतो.
या अभ्यासात असे आढळले की, एपिजेनेटिक (Epigenetic) यंत्रणेद्वारे म्हणजेच जनुकांमध्ये बदल न करता त्यांच्या कार्यपद्धतीवर परिणाम करून, B12 मुळे नवजात बाळाचे आरोग्य सुधारते.

🔴दिनविशेष 
श्यामची आई” या पुस्तकाच्या
लेखनाला सुरुवात (1933)
(साने गुरुजींनी नाशिकच्या
कारागृहात असताना लिहिले)
📲 चालू घडामोडी Telegram Channel Join करा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट